IPL 2024 CSK vs RCB Live : आरसीबीने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Score Today : चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. तत्पूर्वी उद्घाटन सोहळा पार पडेल. या सोहळ्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त प्रसिद्ध गायक ए आर रहमान आणि सोनू निगम हे देखील उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत.

CSK vs RCB Live, IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ या स्पर्धेला आजपासून म्हणजेच २२ मार्चपासून सुरूवात होत आहे. आयपीएल २०२४ चा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आहे. ऋतुराज गायकवाड आता सीएसकेचे नेतृत्व करतोय तर आरसीबी फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. बंगळुरूच्या महिला संघानं प्रीमियर लीग जिंकली असल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये पुरूष संघाकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

CSK vs RCB Live Score, IPL 2024

CSK vs RCB : सलामीच्या सामन्यापूर्वी पार पडणार रंगतदार उद्घाटन सोहळा

आता आयपीएलचा १७वा सीझन सुरू होण्यास थोडाच अवधी शिल्लक आहे. स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सामन्याने होईल. आयपीएलच्या थरारासाठी क्रिकेट चाहते वर्षभर वाट पाहत असले तरी त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. रोमांचक सामन्यांव्यतिरिक्त, आयपीएल उद्घाटन समारंभासाठी देखील प्रसिद्ध आहे, जिथे टीव्ही स्टार्स प्रत्येक वेळी आपली जादू पसरवतात. यावेळीही आयपीएलच्या रंगतदार सुरुवातीसाठी आयोजकांनी धमाकेदार तयारी केली आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सारखे बॉलिवूड कलाकार थिरकताना दिसणार आहेत.

Leave a Comment

close
Thanks !

Thanks for sharing this, you are awesome !